पुणे शहर



ग्रे वॉटर

विषय : पुणे शहरातील जलशुद्धीकरण आणि पुनर्वापराच्या संदर्भात.


पुणे महानगरपालिकेच्या वापरलेल्या पाण्याच्या ड्रेनेजपासून ते जल शुध्दीकरण प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचे दोन प्रकार आहेत. बाथरूम आणि किचनमधून वाहत येणारे पाणी 'ग्रे' असे म्हटले जाते आणि शौचालय ब्लॉक्सच्या पाण्याला काळे पाणी असे म्हटले जाते. एकूण सांडपाण्यापैकीग्रे पाणी टक्केवारी 75% आहे आणि काळे पाणी केवळ 25% आहे. सध्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांत (एस.टी.पी.) संपूर्ण पाणी गोळा केले जाते आणि त्यावर प्रक्रिया करून नंतर ते नदीत सोडले जाते.

जर ग्रे वॉटर गोळा करण्यासाठी वसाहती / इमारतींमध्ये वेगळ्या पाईप लाईन स्थापित झाल्या व त्या आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या स्ट्रॉम वॉटर लाइनशी जोडल्या तर ते पाणी थेट शहराच्या नाला / वाहिनीमध्ये नेले जाईल. प्राथमिक प्रक्रीयासह हे राखाडी पाणी वेगळ्या वाहिनीद्वारे थेट कॅनॉलशी जोडता येईल. हे ग्रे पाणी शेतीसाठी वापरले जाऊ शकते. सध्या 8 टीएमसी पाणी शेतीसाठी वापरले जाते ते वाचू शकेल. तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असल्यास पाणी अधिक शुद्ध करण्यासाठी कालव्यामध्ये काही गाळण्यांचीव्यवस्था केली जाऊ शकते.ते पाणी शुध्दीकरणाचे कमी खर्चिक आणि देखभालीचा मोफत व नैसर्गिक मार्ग आहे.

या कारणासाठी ग्रे वॉटर गोळा करण्यासाठी वसाहती / इमारतींमध्ये वेगळ्या पाईप लाईनचीआवश्यकता आहे. अशा भांडवली खर्चासाठी त्यांना विशिष्ट टीडीआर / डीआरसी पुरवून जिथे आधीच एस.टी.पी. प्रतिष्ठापित आहे अशा काही नवीन वसाहतीच्या बाबतीत ते आपल्या उद्यानासाठी प्राथमिक प्रक्रियेनंतर ग्रे वॉटर वापररू शकतात आणि शिल्लक राहिलेले ग्रे पाणी वर नमूद केल्याप्रमाणे निकालात काढले जाऊ शकते.

फक्त 25% काळे पाणी (ड्रेनेज पाणी) पूर्णपणे प्रक्रिया करुन त्याद्वारे एस.टी.पी. वरील भार अत्यंत कमी होतील त्यामुळे एस.टी.पी चालवण्यासाठीच्याखर्चात बचत होईल. उपरोक्त कामांसाठी पुणे महानगर पालिकेने तज्ञ सल्लागारांची नेमणूक करावी. उपरोक्त काम केंद्र सरकारच्या जेएनएनआरआरयूएमच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट केले पाहिजे.


ठळक मुद्दे :

  • धरणाच्या पाण्याचा वापर कमी करणे.
  • एस.टी.पी. चालविण्याच्या खर्चात 75% बचत.
  • ग्रे आणि पाणी हाताळणीसाधी आणि अत्यंत सोपी.


आबा बागूल
नगरसेवक, पुणे महानगरपालिका