सध्या पुणे स्टेशन ते चव्हाण नगर या बस मार्ग क्रमांक ३१,३२,३३ चा रूट बदलल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. जिथे प्रवाशी संख्या नाहीत असा मार्ग असल्याने या बससेवेचा लाभ नागरिकांना होत नाही. विशेषतः शंकर महाराज मठ मार्गे ऐवजी तो पूर्ववत चव्हाणनगरमार्गे संभाजीनगर असा करावा जेणेकरून प्रवाशांना दिलासा मिळेल.कृपया वरील बस मार्ग पूर्ववत करावा ही विनंती
प्रदूषणाला आळा ;उदयोन्मुख
गुणवत्तेला लाभणार नवे व्यासपीठ
पुणे :
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सायकल चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापौर चषक स्पर्धेमध्ये सायकल स्पर्धेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.सद्यस्थितीत वाहनांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत
पुणे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या राजीव गांधी ई - लर्निंग स्कुलने सलग सहाव्यांदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावी आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात
पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक महर्षी स्व. दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. या महान चित्रमहर्षीची कीर्ती आणि स्मृती जागती ठेवण्यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी शिवदर्शन येथील यशवंतराव चव्हाण...
पुणे लोकमान्य टिळक यांचा राजस्थानमधील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये अपमान केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने पुणे शहर काँग्रेसकडून राजस्थान सरकारचा केसरीवाडा येथे निषेध करण्यात आला आणि कोणत्याही परिस्थितीत लोकमान्यांचा अवमान सहन करणार नाही असा इशाराही देण्यात आला.
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना थंडगार पाणी मिळाल्याचा आनंद अवर्णनीय असतो.हाच आनंद पक्ष्यांना मिळावा व रणरणत्या उन्हात फिरताना त्यांना थंडगार पाणी मिळावे यासाठी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांच्या पुढाकाराने मातीची ५००० भांडी तयार करून पक्षी प्रेमी नागरिकांना ती मोफत देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
वाढत्या अपघातांचे प्रमाण आणि वेळेवर न मिळणाऱ्या मदतीमुळे अनेक अपघातग्रस्तांचा जीव धोक्यात येत असल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील मुख्य चौकांमध्ये चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी थांबे उभारावेत तसेच शासकीय ,निमशासकीय आणि खासगी रुग्णवाहिका एका यंत्रणेवर सुसंगत करण्याची नितांत गरज आहे. नुकतीच पाषाण परिसरात अपघाताची घटना घडली
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक महर्षी स्व. दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. या महान चित्रमहर्षीची कीर्ती आणि स्मृती जागती ठेवण्यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी शिवदर्शन येथील यशवंतराव चव्हाण उद्यानात चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारलेल्या फोर -डी थिएटरच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवाराने गुजर निबाळकर वाडी येथील ममता फौंडेशनमधील एड्सग्रस्त मुला -मुलींसाठी मनसोक्त आंबे खा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्राजक्ता माळीही सहभागी झाल्या होत्या.त्यावेळी त्या बोलत होत्या.
आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतातील पहिल्या ग्रे वॉटर प्रकल्पाचं शुद्ध केलेलं पाणी आज पासून तळजाई टेकडीला पोहोचणार आहे. कै. वसंतराव बागुल उद्यानापासून शुद्ध झालेलं हे पाणी दररोज ५ लाख लिटर इतकं असेल. यामुळे संपूर्ण तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहण्यास मदत होणार असून पर्यायाने जैवविविधतेचं रक्षण शक्य होणार आहे. पक्षी, प्राणी आणि इतर जीवांना या परिसरात व्यवस्थितपणे वर्षभर पाणी मिळेल.
आज सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया सुरु झाली असून कै. वसंतराव बागुल उद्यान, सहकार नगर येथून या प्रक्रियेला प्रारंभ झाला.
आक्रमक, अभ्यासू आणि समाजाच्या विविध प्रश्नांची जाण, कॉमनमॅनविषयी आस्था असणारे काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील गटनेते मा. श्री. मल्लिकार्जुनजी खर्गे साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल दिल्ली येथील निवासस्थानी मा .उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी श्री. आबा बागुल यांनी माननीय मल्लिकार्जुनजी खर्गे साहेब यांचा विशेष सत्कार