स्व - परिचय

स्व - परिचय

Best MLA from Congress for 2019 aba bagul

नाव : उल्हास उर्फ आबा बागुल
वय : ५५ वर्ष
विद्यमान राजकीय स्थान : विद्यमान नगरसेवक,
काँग्रेस सदस्य.
काँग्रेस पक्षामधील कार्यकाल : ३० वर्षे
पुणे महानगरपालिकेतील कार्यकाल : सलग २२ वर्षे


मी उल्हास उर्फ आबा बागुल कांग्रेस पक्षाचा हाडामासाचा कार्यकर्ता आहे. युवक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ३० वर्षांपूर्वी माझ्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली. मी गेली २२ वर्षे पुणे महानगर पालिकेचा सदस्य आहे. मी पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे व त्या नंतर मी पक्षाचा गटप्रमुख व विरोधी पक्ष नेता झालो. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून गेली तीन दशके विविध उपक्रमांतून समाजाची सेवा करीत आलो आहे. पुणे शहराच्या विकासकामात हातभार लावण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे.
काँग्रेस पक्षावर माझी अढळ श्रद्धा आहे आणि सध्याच्या पडत्या काळात पक्षाचा झेंडा उंच फडकवत ठेवण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सामाजिक न्याय व समानता ही कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे मी सदैव उराशी बाळगून आहे. श्रीमती इंदिरा गांधी व श्री. राजीव गांधी या दिवंगत नेत्यांविषयी माझ्या मनात नितांत आदर व प्रेमाची भावना आहे. श्री राजीव गांधी यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरापोटी व पुणे महानगर पालिकेच्या कृपेने मी गरीब विद्यार्थ्यांसाठी एका अभिनव शाळेची २०१२ साली स्थापना केली. या शाळेचे नाव राजीव गांधी अकॅडेमी ऑफ ई-लर्निंग असे ठेवण्यात आले आहे.
युवक, ज्येष्ठ नागरिक व वंचित वर्गहे माझे सर्वात आवडते समाज घटकआहेत. शहराच्या क्षितीज रेषेचे सौंदर्य अबाधित राखून शहराच्या सौंदर्यात भर घालणारीनाविन्यपूर्ण उद्याने,स्थापत्य रचना व सभागृहांची निर्मिती, किमान नागरी सुविधा पुरविणे, गरीब व ज्येष्ठ नागरिकांसाठी वाराणसीची नि:शुल्क यात्रा घडवून आणणे, सर्व धर्माच्या नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अशा माझ्या विविध उपक्रमांचा या घटकांना लाभ झाला आहे.
पुणे शहराचा विकास घडवून आणणाऱ्या धोरणात्मक बदलांचा मी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पुणे मनपा चा महसूल वाढावा या दृष्टीने मी खूप प्रयत्न केले. यांपैकी प्रीमियम FSI,onetimetax, महसूल समितीचे गठन, जाहिरात फलक लावण्याविषयीचे नियम अशांसारख्या काही योजना अंमलात येत आहेत.

कार्याचा संक्षिप्त आढावा


पुणे शहराच्या सौंदर्यात व प्रसिद्धीत भर घालण्यात माझा मोठा वाटा आहे. फुलपाखरू उद्यान, जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती, संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे, 4D लेझर शो, 4D चित्रपटगृह, नाला पार्क ,भारत रत्न पंडित भीमसेन जोशी कला दालन, विजय तेंडुलकर नाट्यगृह,परदेशी नाला पार्क, क्रीडा संकुल संगणक लायब्ररी अशांसारखे अनेक उपक्रम पुणे महानगर पालिकेच्या सहकार्याने मी कार्यान्वित केले आहेत. केवळ दीड वर्षात भारत रत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन व संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे या दोन स्थळांना १५ लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. तारांगण, मेणाच्या प्रतिकृतींचे संग्रहालय, प्रकाश व ध्वनी माध्यमांचा मेळ साधणारा प्रयोग अशा अजून काही योजना माझ्याकडे तयार आहेत. त्यांचा अंमल होणे बाकी आहे.

पुणे शहराच्या विकासासाठी अनेक योजना माझ्या नेतृत्वाखाली आखण्यात आल्या आहेत. यांत वाहतूक बोगदा, HCMTR रस्त्याच्या कामाचा आढावा, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता गृहे, प्रदूषण विरहित परिसरासाठी दुचाकीसाठी स्वतंत्र मार्ग, सांडपाणी शुद्धीकरण अशा उपक्रमांचा समावेश आहे.

राजीव गांधी E-learning अकादमी हे देशात एकमेकाद्वितीय असे माझे स्वप्नशिल्प आहे. देशासाठी ते एक आदर्श उदाहरण आहे. समाजातील दुर्बल घटकांतील मुले इलेक्ट्रोनिक शिक्षण पद्धतीद्वारे येथे शिक्षण घेत आहेत. याचा विशेष म्हणजे मुलांना दप्तराचे ओझे पेलावे लागत नाही. चाकोरीबाहेरची नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. पुणे महानगर पालिकेच्या या शाळेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २०१२ साली झाले. तेव्हापासून देशातील अनेक राजनैतिक व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, शिक्षण तज्ञ शाळेला आवर्जून भेट देत असतात. शाळेत मुलांना अतिशय उच्च दर्ज्याचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर गरीब कुटुंबातील मुलांना मोफत जेवण व अन्य सुविधा पुरविल्या जातात. सध्या CBSE बोर्डाच्या बारावी पर्यंतचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थाच्या प्रवेश पूर्व अभ्यासक्रमाची तयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षण सुविधा अल्प काळात सुरु होणार आहे.

शहरासाठी माझी आणखी एक अभिनव कल्पना म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना (SRA). या योजनेअंतर्गत झोपडपट्टीचे सध्याच्या स्थानापासून स्थलांतर करावयाचा प्रस्ताव आहे. कोणा बांधकाम व्यावसायिकाला पुनर्वसनाचे काम देण्यापेक्षा प्रत्येक झोपडपट्टी रहिवाशाला सुमारे ३० ते ४० लाख रुपये किंमतीचे विकास हक्क पत्र ( Development Right Certificate -DRC) दिल्यास हे पत्र विकून त्याला आपल्या आवडीचे व हवे तसे घर विकत घेता येईल. यामुळे पुणे मनपा लाही क्रीडांगणे, शाळा, इस्पितळे, बागबगीचे व वाहनतळ यांसाठी मोकळी जागा उपलब्ध होईल. या प्रस्तावाला SRA समितीने मान्यता दिली असून राज्य सरकारची मंजुरी अपेक्षित आहे. या योजनेची माहिती व्हावी या दृष्टीने मी हजारो झोपडवासीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला व त्याला कॉंग्रेसचे परंपरागत मतदार असलेल्या झोपडवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आपले राहणीमान उंचावू शकेल अशी आशा या चळवळीने त्यांच्या मनात निर्माण केली आहे.

गेली १२ वर्षे सातत्याने वृद्ध व गरीब लोकांसाठी काशी (वाराणसी) विनामूल्य तीर्थयात्रेचे यशस्वी आयोजन केले जात आहे. आतापर्यंत ५०,००० हजार भक्तांनी याचा लाभ घेतला आहे. पुणे – वाराणसी – पुणे अशा खास गाडीची व्यवस्था केवळ या यात्रेसाठी केली जाते.

मी अजून एक उपक्रम दर वर्षी राबवीत असतो: दहा दिवसांचा नवरात्र उत्सव “पुणे नवरात्री सांस्कृतिक महोत्सव” या नावाने होत असतो. जिथे हा महोत्सव साजरा होतो त्या महालक्ष्मी मंदिराची उभारणी माझ्याच प्रेरणेने झाली. या महोत्सवात पं. भीमसेन जोशी, पं. शिव कुमार शर्मा, पं. हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांनी बहारदार गायन – वादन सादर करून महोत्सवाची शान वाढवली आहे. १९ वर्षांची परंपरा असलेल्या या महोत्सवात लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार व महर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. याच वेळी महिला महोत्सवही साजरा केला जातो. यामध्ये हजारो महिलांचा सहभाग असतो.

प्रमुख पाहुणे किंवा सन्मान्य पाहुणे या नात्याने या कार्यक्रमाला अनेक थोर मंडळींची उपस्थिती लाभली आहे. त्यांतील काही नावे – मा. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, श्रीमती अंबिका सोनी, श्री. पतंगराव कदम, श्री. हर्षवर्धन पाटील, श्री. सुरेश कलमाडी, श्री. उल्हास पवार

धर्म निरपेक्षता व सर्व धर्मांप्रती सद्भाव व प्रेम ही तत्वे म्हणजे माझा जीव की प्राण.वेगवेगळ्या धर्मांतल्या सुमारे १०,००० गरीब मुलांसोबत मी दर वर्षी नाताळ सण साजरा करतो. तसेच रमजान ईद च्या वेळी ईद सण साजरा करतो. यात ७००० लोकांचा सहभाग असतो. याचा एक भाग म्हणून अंधांसाठी दिवाळी साजरी करणे, शालेय मुलांसाठी कोकण व अजंठा येथे इतिहास व निसर्गसंशोधन सहलींचे आयोजन हे उपक्रम राबविले जातात.

वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, मोफत वेद्यकीय तपासणी, गरीब मुलांसाठी मोफत पुस्तक वाटप, गरजू मुलांना शेक्षणिक मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, आधार कार्ड जोडणी संदर्भात मदत असे विविध उपक्रम मी इंदिरा फौंडेशन च्या नावे हाती घेतले आहेत.